सातत्याने होत असलेल्या तेलदरवाढीवर आता केंद्रातील यूपीए सरकारमधील घटक पक्षांना चिंता होऊ लागली आहे.
यूपीएतील दुसरा सर्वात मोठा यूतीपक्ष असलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी तर या प्रश्नावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा काल दिला. नॅशनल कॉन्फरन्स आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही तेल दरवाढीचा फेरविचार व्हावा अशी मागणी केली आहे. खुद्द कॉंग्रेस पक्षानेही घटक पक्षांच्या भावनांचा विचार व्हावा असा सल्ला सरकारला दिला आहे.
दरम्यान, सरकारच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे तेलकंपन्यांना आपल्या दरात वाढ करणे भाग पडले आहे.