मिझोरमच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांना पदावरून हटविण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने काल घेतला. आता मणिपुरचे राज्यपाल विनोद कुमार दुग्गल हे मिझोरमचा अतिरिक्त कारभार सांभाळतील. ८७ वर्षीय बेनीवाल या गुजरात राज्यपाल होत्या. त्यांची कारकिर्द नरेंद्र मोदी (गुजरातचे मुख्यमंत्री असताना) यांच्याशी वादामुळे बरीच गाजली होती. बेनिवाल यांना ६ जुलै रोजी गुजरातहून मिझोरमला पाठविण्यात आले होते.