घरे पाडावी लागलेल्यांचे पुनर्वसन करणार

0
89

पणजी ते जुने गोवे रस्ता
पणजी ते जुने गोवे दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या प्रकल्पामुळे ९ घरे पाडावी लागतात. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना घरे बांधून देण्यासाठी जवळच्या भागातच जमीन ताब्यात घेतल्याची माहिती साबांखामंत्री सुदीन ढवळीकर यांनी काल शून्य प्रहरास दिली. कुंभारजुवेंचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी यासंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता.