Home Featured राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १ रोजी सुनावणी

राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १ रोजी सुनावणी

0

खाण पर्यावरण परवान्यासाठी सहा कोटींची खंडणी घेतल्याचा कथित आरोप असलेले विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व आमदार विश्वजित राणे यांनी म्हापसा येथील सीबीआय न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता सुनावणी होईल. राणे-पिता पुत्राविरोधात राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विशेष तपास पथकाने भ्रष्टाचार, खंडणी व कटकारस्थान असे गुन्हे दाखल केले आहेत. ५ जुलै रोजी राणे-पिता पुत्राने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत राणे पिता पुत्रांना अटक करू नये, तसेच त्यांनी गोवा सोडून जाऊ नये असे आपल्या अंतरिम आदेशात म्हटले होते. कालच्या युक्तीवादानंतर सरकारी वकिलांनी युक्तीवाद करण्यासाठी १ ऑगस्ट दुपारी २.३० वेळ मागून घेतला.