Home बातम्या भाजप ‘चुकी’ची माफी मागण्यास तयार

भाजप ‘चुकी’ची माफी मागण्यास तयार

0

संधी देण्याचे मुस्लिमांना आवाहन

कॉंग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता मुस्लिम समुदायाने येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला संधी द्यावी असे आवाहन करतानाच गतकाळात समजा पक्षाकडून काही चूक झाली असेल तर पक्ष माफी मागण्यास तयार असल्याचे भाजपने काल म्हटले.

मुस्लिम समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भाजप मुस्लिम विरोधी पक्ष नाही, यावेळी समाजाने देशासाठी भाजपला मतदान करावे. सरकार निवडण्यासाठी नव्हे, देश घडवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपसाठी देशाचे संविधान हाच धर्म असून हिंदुत्व ही एक जीवन पद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. मोदींनी निधर्मीपणाची व्याख्या ‘इंडिया फस्ट’ अशी केल्याचे त्यांनी सांगितले.