गोवा सरकारने ‘ओला कॅब’ या कंपनीला राज्यात टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यास दिल्यानेच वरील हिंसा भडकल्याचे राणे म्हणाले. त्यांना बेकायदेशीररित्या गोव्यात व्यवसाय कसा सुरू करू दिला, असा प्रश्न राणे यांनी केला. ‘ओला कॅब’वर आता सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी राणे यांनी केली.
गोव्यात मोठ्या प्रमाणात बेकारी आहे. गोव्यातील कित्येक लोक टॅक्सी व्यवसायात आहेत. असे असताना राज्याबाहेरील लोकांना येथे टॅक्सी व्यवसाय सुरू करू देणे योग्य ठरणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
खाणींसाठी प्रयत्न हवेत
खाणींसंबंधी बोलताना राणे म्हणाले, की दोन वर्षांपासून राज्यातील खाण व्यवसाय बंद असून तो लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी गोवा सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. एप्रिल-मे महिन्यानंतर खाण मौसम संपत असून तद्पूर्वीच खाणी सुरू होतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे त्यासाठी संपर्क साधायला हवा. खाणी बंद झाल्यामुळे खाणींवर अवलंबून असलेले सामान्य लोक संकटात सापडले आहेत. खाण कामगार, ट्रक मालक, बार्जमालक यांची स्थिती बिकट झाली असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यासंबंधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात देण्याची गरज असून तो त्यांनी लवकर द्यावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. आपण त्यासाठी पाहिजे ती मदत करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार कधी जाहीर करण्यात येतील. विष्णू वाघ यांना कॉंग्रेस उमेदवारी देण्यात येणार आहे काय, असे विचारले असता तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याने त्याबाबत आपणाला काही विचारू नका, असे ते म्हणाले.