ताळगाव पंचायतीच्या येत्या निवडणुकीत बाबूश मोन्सेर्रात यांच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटला शह देण्यासाठी आग्नेल सिल्वेरा हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतःचे पॅनल उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. सिल्वेरा हे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य असून आपल्याला अशा प्रकारचा गट स्थापन करण्याचा आग्रह आपल्या कार्यकर्त्यांनी धरला असल्याचे सिल्वेरा यांचे म्हणणे आहे.
भाजपाचे ताळगावमधील सध्याचे नेतृत्व कमजोर असून चांगले उमेदवार उभे केले गेले नाहीत, तर मोन्सेर्रात गटाला फायदा मिळेल अशी भीती सिल्वेरा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.