Home बातम्या राज्यातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्राकडून १०० कोटी रु. मंजूर

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्राकडून १०० कोटी रु. मंजूर

0
या निधीतून अनमोड ते फोंडा, काणकोण ते मडगाव व बोरी ते फोंडा या मार्गांचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे, असे सांगतानाच एवढा निधी केंद्राकडून यापूर्वी गोव्याला मिळाला नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून गोव्याला ११०० कोटी रु. मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. हा निधी मिळाल्यानंतर खांडेपार पूल, ढवळी बगलमार्ग, रायबंदर बगल मार्ग, जुने गोवे ते पणजी या मार्गावर दुचाकी गाड्यांसाठी विशेष मार्ग आदी कामे हाती घेण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

४० टक्के पाण्याचा हिशेब नाही

दरम्यान, पाणी पुरवठा खात्यातर्फे पुरवण्यात येणार्‍या पाण्यापैकी ४० टक्के पाण्याचा हिशेब मिळत नाही, असे ते म्हणाले. येत्या दोन वर्षांत हे प्रमाण ४० वरून २० टक्क्यांवर आणण्यात येणार असल्याचे सांगून त्यासाठीची उपाययोजना म्हणून दक्षिण गोव्यात नवे विदेशातून आयात केलेले पाण्याचे मीटर बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर उत्तर गोव्यात टप्प्या टप्प्याने हे मीटर बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मीटर न चालणे, मीटरमधील रिडिंग घेताना चुका करणे, जलवाहिन्या फुटणे, पाण्याची चोरी यामुळे ४० टक्के पाण्याचा हिशेब मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर सगळी ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, शनिवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, मीटर रिडर्स आदींबरोबर आपण बैठक घेऊन विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्याचे त्यांनी सांगितले.