Home बातम्या अज्ञात चोरट्यांनी ७९ हजार एटीएम खात्यातून चोरले

अज्ञात चोरट्यांनी ७९ हजार एटीएम खात्यातून चोरले

0
पर्वरी येथे राहणार्‍या कमांडर किथ ऍन्थनी सुवारिस यांच्या एटीएम खात्यामधून अज्ञात चोरट्यांनी ७९,२३७ रु. काढून नेण्याची घटना २२ व २३ जानेवारी या दरम्यान घडली. या प्रकरणी त्यांची पत्नी दोना सुवारिस यांनी पर्वरी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

यासंबंधी किथ ऍन्थनी सुवारिस यांच्या पत्नी दोना सुवारिस यानी पर्वरी पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीत आय्‌सीआय्‌सीआय् बँकेच्या टोंक येथील एटीएम्‌मधून सदर पैसे काढण्यात आल्याचे त्यानी तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्यांनी नेमके हे पैसे कसे काढले हे कळु शकले नाही.