सरकारी अधिकारी, कर्मचारी दुर्घटनास्थळी
चावडी-काणकोण येथील रूबी रेसिडेन्सी संकुलातील इमारत दुर्घटना घडल्या दिवसापासून काणकोणचे प्रशासन ठप्प झाले आहे. तालुक्यातील मामलेदार, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, गटविकास कार्यालयातील बहुतेक सर्व कर्मचारी दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारतीमध्ये दैनंदिन कामाला येणार्या नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढायला लागल्या आहेत.
ज्या बांधकाम व्यावसायिकामुळे ही दुर्घटना घडली तो अद्याप पोलिसांना आढळत नाही आणि बचाव कार्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा या ठिकाणी राबत आहे. हा सगळा खर्च रूबी रेसिडेन्सीच्या मालकांकडून वसूल करून घ्यावा, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहेत.