Home बातम्या काणकोण दुर्घटनेमुळे इमारत तपासणीच्या हालचाली

काणकोण दुर्घटनेमुळे इमारत तपासणीच्या हालचाली

0
काणकोण येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यातील वेगवेगळ्या शेत जमिनींचे रूपांतर करून उभारलेल्या इमारतींमध्ये वास्तव्य करणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेकांनी आपल्या इमारतींची तपासणी करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही नगरनियोजन, तसेच पालिका, पंचायतीचे बांधकामासंबंधीचे नियम कडक करण्याचे जाहीर केले आहे. नव्या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत लोक गंभीरपणे विचार करीत असून सरकारने शक्य तितक्या लवकर नवीन मार्गदर्शक तत्वे तयार करावीत अशी मागणी आहे.