Home बातम्या प्रताप चणेकर अपघातात ठार

प्रताप चणेकर अपघातात ठार

0
येथील राजेश कोल्ड्रिंकचे मालक तथा डिचोलीतील माजी फुटबॉलपटू प्रताप शंभू चणेकर (५२, सास्टिवाडा-बोर्डे), काल सकाळी एका दुचाकीने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाले. कालच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काल सकाळी ८च्या दरम्यान चणेकर हे त्यांच्या ऍक्टीवा गाडी क्र. जीए ०४ ए ७८५ घेऊन येत असताना समोरून येणार्‍या पल्सर बजाज मोटरसायकलने (जीए ०४ के ३५४२) त्यांना धडक दिल्याने प्रताप यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. त्यांना त्वरीत डिचोली आरोग्य केंद्रात आणले असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर अपघातप्रकरणी डिचोली पोलिसांनी क्षीतिज गडेकर यास अटक करून जामिनावर सुटका केली.