Home बातम्या आमीर खानला आरटीओकडून दंड

आमीर खानला आरटीओकडून दंड

0

सुपरस्टार आमीर खान याला सातारा वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघने केल्याबद्दल १०० रु. दंड ठोठावला.

आमीर हा पत्नी किरण रावसह पाचगणीहून सातारा येथे फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठार पाहण्यासाठी आला होता. यावेळी लवकर पोहोचण्यासाठी त्याने थेट नो एंट्रीमधून गाडी नेली. वाहतूक पोलिसांनी हा प्रकार बघितला आणि गाडी थांबवली. आमीरने लगेच गाडीतून बाहेर येऊन वाहतूक पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला व रु. १०० दंड भरला.