सध्या कारागृहात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते व माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या कथित हस्तकास दिल्ली पोलिसांनी काल अटक केली. शहाबुद्दीन यांच्या सांगण्यावरून आपण ११ जणांचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आफताब आलम (३३) असे त्याचे नाव आहे. खून, खुनाचा, प्रयत्न, चोरी, अपहरण अशा २० प्रकरणांत तो पोलिसांना हवा होता. १९९०पासून वयाच्या १४व्या वर्षी त्याने गुन्हेगारी जगतात प्रवेश केला होता.