Home बातम्या धेंपोचा चर्चिल ब्रदर्सवर आकर्षक विजय

धेंपोचा चर्चिल ब्रदर्सवर आकर्षक विजय

0
या विजयामुळे धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे ११ सामन्यातून २३ गुण झाले असून ते तिसर्‍या स्थानावर आहेत. तर चर्चिल ब्रदर्स पराभवामुळे २३ गुणांवर असून गोलसरासरीमुळे त्यांनी आपले दुसरे स्थान राखले आहे.  

काल धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचे प्रशिक्षक आर्थुर पापाझ यांनी आपल्या रणनतिनुसार संपूर्ण युवा खेळाडूंचा संघ मैदानावर उतरविला. त्यात त्यांना यशही आले. चर्चिल ब्रदर्स संघाने आक्रमक सुरुवात करताना पहिल्याच मिनिटाला चढाई केली. परंतु त्यांचे प्रयत्न वाया गेले. १० व्या मिनिटाला चर्चिल ब्रदर्सच्या मिकी फर्नांडिसने घेतलेले लांबपल्ल्यावरूनचा फटका बराच बाहेर गेला. ११ व्या मिनिटाला चर्चिलला पुन्हा एकदा आघाडी घेण्याची संधी चालून आली होती. परंतु जेसन वालीसच्या पासवर थँगजॅम सिंहने घेतलेल्या जोरकस फटका धेंपोचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टमणीने थोपविल्याने संकट टळले. २२ व्या मिनिटाला चर्चिलला पुन्हा एकदा आघाडीची संधी मिळाली होती. परंतु आलेश सावंतकडून मिळालेल्या पासवर जेसर वालीसेन घेतलेल्या उजव्या पायाच्या जोरकस फटक्यावरील चेंडू धेंपोच्या गोलपोस्टच्या डाव्या बाजूने थोडक्यात बाहेर गेला. २५ व्या मिनिटाला धेंपोने आघाडी घेण्यात ये मिळविले. धेंपोच्या ऑलविन जॉर्ज आणि रोमीओ फर्नांडिसने रचलेल्या चालीवर चर्चिलच्या रावण धर्मराजने चेंडू क्लीअर करण्याचा प्रयत्न केला. परंतु चुकून चेंडू उजव्या विंगेतील निक्सन कास्तान्हाकडे गेला आणि त्याने कोणतीही चूक न करता जोरकस फटक्याद्वारे चर्चिलच्या गोलपोस्टची जाळी भेदली.
३७ व्या मिनिटाला चर्चिलला बरोबरीची संधी मिळाली होती. परंतु त्यांनी ती वाया घालविली. जेसनने घेतलेल्या कॉर्नरवर धेंपोच्या खेळाडूने चेंडू क्लीअर करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी डी कक्षेत असलेल्या मिकी फर्नांडिसने घेतलेला जोरकस फटक्यावरील चेंडू गोलपोस्टच्या थोडक्यात वरून गेला. ४५ व्या मिनिटला चर्चिलला आणखी एक बरोबरीची संधी हुकली. परंतु जेसनने घेतलेल्या कॉर्नरवर संजय बालमुचूने हेडर थोडक्यात बाहेर गेला.
दुसर्‍या सत्राच्या प्रारंभीच धेंपोला आपली आघाडी वाढविण्याची संधी हुकली. निकसनच्या पासवर मायरन फर्नांडिसला समोर असलेल्या चर्चिलच्या गोलरक्षकाला चकविता आले नाही, ५२ व्या मिनिटाला धेंपोने पुन्हा एक चांगली चढाई केली. परंती निक्सनने गोलपर्यंत पोहचण्यात थोडा उशीर केला आणि चर्चिलला गोलरक्षक बिलाल खानने चेंडू परतवून लावला. ५५ व्या मिनिटाला धेंपोला फ्री- कीक मिळाली. परंतु मंदार रावने घेतलेला फ्रीकीकवरील चेंडू गोलपोस्टच्या थोडक्यात बाजूने बाहेर गेला. ५८ व्या मिनिटाला चर्चिलची गोलबरोबरीची संधी पुन्हा एकदा हुकली. फ्री-कीवर मिकी फर्नांडिसने घेतलेला फटका गोलरक्षक कट्टमणीने चपळगतीने चेंडूला बाहेरची दिशा दाखवीत संघावरील संकट टाळले. चर्चिलला पुन्हा एकदा गोलसंधी हुकली. मिकीच्या फ्रीफीकवर जेसन वालीसने घेतलेल्या हेडरवरील चेंडू आडव्या बारवर आदळून परत आला. ७० व्या मिनिटाला गाब्रियलच्या पासवर ऑलविनने संधी दवडली. 
८५ व्या मिनिटाला धेंपोने आपली आघाडी वाडविणारा दुसरा गोल नोंदविला जॉय फेर्राव कडून मिळालेल्या पासवर ऑलवीन बॉर्जीसने विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल नोंदवला. 
सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलसाठी निक्सन कास्तान्हाची तर ऑलवीन जॉर्जची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.