रांची ः येथील प्रभात तारा मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातील प्रमुख कार्यक्रम काल पार पडला. सुमारे ४० हजारजणांची उपस्थिती लाभलेल्या या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग होता. प्रत्येकाने जीवनभर योगाभ्यास करावा असे आवाहन यावेळी मोदी यांनी केले.