राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने पणजी महानगरपालिकेच्या 30 प्रभागाची फेररचना अधिसूचना जाहीर केली आहे. पणजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग फेररचना जाहीर करण्यात आली आहे. या महानगरपालिका मंडळाची मुदत मार्च 2026 मध्ये पूर्ण होत आहे. प्रभाग फेररचनेबाबत सविस्तर माहिती सरकारी पत्रकातून जाहीर करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने प्रभाग फेररचनेचा मसुदा जारी करून नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या होत्या.