0
422

भ्रष्टाचार मुक्तीसाठी ग्रामसभांना
जास्त अधिकार हवेत ः केजरीवाल

>> फोंड्यात ‘युवा संवाद’ कार्यक्रम

भ्रष्टाचारामुळे ड्रग्स, कॅसिनो व वेश्या व्यवसाय गोव्यात वाढला असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी पंचायत पातळीवरील ग्रामसभेतील निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे. कारण निवडून दिलेले आमदार त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेऊन लोकांवर अन्याय करतात. त्यामुळे ग्रामसभांना अधिक अधिकार देणे गरजेचे असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काल कुर्टी-फोंडा येथे सांगितले.
येथील समिती सभागृहात आयोजित केलेल्या ‘युवा संवाद’ या कार्यक्रमात केजरीवाल यांनी युवकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. यावेळी डॉ. हेमाली देसाई, राजश्री नगर्सेकर, ऑस्कर रिबेलो, वाल्मिकी नाईक, पंकज गुप्ता, ऍड. सुरेल तिळवे, युगांक नाईक व अन्य कार्यकर्त्यांबरोबर राज्यभरातील सुमारे २०० हून अधिक युवा-युवतींची उपस्थिती होती. आम आदमी पक्ष हा पक्ष नसून एक आंदोलन आहे. देशाची जबाबदारी असलेला युवा वर्ग या आंदोलनाची शक्ती आहे. राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आज युवा वर्गाने राजनीती बदलण्याची गरज असल्याचे श्री. केजरीवाल यांनी सांगितले.
गोव्यातील सरकारी शाळांची दुर्दशा झाल्याने पालक आपल्या मुलांना खासगी शाळांत पाठवितात. मात्र, खासगी शाळेत दरवर्षी वाढणारी ङ्गी पालकांना त्रासदायक ठरत आहे. सरकारी शाळांची स्थिती बदलण्यासाठी दिल्लीप्रमाणे सरकारने अर्थसंकल्पात दुप्पट निधीची तरतूद करणे गरजेचे असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.