पेडणे पोलिसांनी २० रोजी पहाटे ३.४५ वा. कुलू हिमाचल प्रदेश येथील ओंकार तेजराम याच्याकडून हरमल मधलावाडा येथे ३ किलो ७०० ग्रॅम चरस जप्त करून व त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. जप्त केलेल्या मालाची किंमत ८ लाख दहा हजार रु. आहे.
२० रोजी रात्रो १.३० ते ३.४५ वा. हरमल मधलावाडा मासळी मार्केट जवळील मिठागरासमोर तेजराम हा ग्राहकाला ड्रग्स देण्यासाठी आला होता. दबा धरलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ किलो ७०० ग्रॅम चरस मिळाला. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश केरकर, उपनिरीक्षक सागर घाटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमनाथ सावळ देसाई, फटी नाईक, ओमप्रकाश पाळणी, बंडू गावस, योगेश गावकर, प्रसाद तुयेकर, संदीप गावडे, स्वप्नील शिरोडकर व विशाल नाईक आदीनी ही कारवाई केली.