Home बातम्या ५ लाख रु.पर्यंत आयकर माफ करण्याची मागणी

५ लाख रु.पर्यंत आयकर माफ करण्याची मागणी

0

डायरेक्ट टॅक्स कोड (डीटीसी) संबंधी संसदीय समितीतील काही सदस्यांनी आयकर सुट मर्यादा ५ लाख रु.पर्यंत वाढविण्याची काल मागणी केली.

अर्थविषयक स्थायी समितीची बैठक यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समिती याविषयी अंतिम अहवाल दि. २ मार्चपर्यंत निश्‍चित करणार आहे. समितीची पुढील बैठक २४ रोजी होत आहे. रुपयाचे घसरलेले मूल्य व वाढती महागाई यामुळे ५ लाखांपर्यंत आयकर सूट देण्यात यावी अशी मागणी समितीतील काही सदस्यांना केल्याचे, सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, डीटीसी विधेयकातील काही तरतूदी १६ रोजी सादर होणार असलेल्या अर्थसंकल्पात घेण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, समितीने याआधी आपल्या अहवालात आयकर सुटीची मर्यादा सध्याच्या रु. १.८ लाखांवरून रु. ३ लाख करण्याची मागणी केली आहे.