५१ व्या इफ्फीचा पडदा आज उघडणार

0
202

>> केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची उपस्थिती

५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन शनिवार १६ जानेवारीला केले जाणार आहे. हा चित्रपट महोत्सव हायब्रीड पद्धतीने होणार आहे. ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार्‍या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड सिने कलाकार सुदीप संजीव, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. इटालियन सिनेमोटोग्राफर व्हिटोरिओ स्टोरो यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. यावेळी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची उपस्थिती होती.

इफ्फीचा प्रारंभ थॉमस विंटरवर्गच्या अनदर राऊंड या चित्रपटाने केला जाणार आहे. महोत्सवात ६० देश सहभागी आहेत. इफ्फीत बांगलादेशवर फोकस केला जाणार आहे. आयनॉक्स आणि कला अकादमीमध्ये चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. चित्रपटगृहात ९२० जणांना प्रवेश दिला जाणार आहे. इफ्फीनिमित्त पणजी शहरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.