शेतकर्‍यांसोबत केंद्राची नववी चर्चाही निष्फळ

0
211

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांत काल पुन्हा झालेली चर्चाही निष्फळ ठरली आहे काल ही एकूण चर्चेची नववी फेरी होती. या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुढील चर्चा आता पुन्हा १९ जानेवारी रोजी होणार आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी, तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि एमएसपीवरील हमी ही आमची मागणी कायम असून आम्ही केंद्राशीच चर्चा करणार असल्याचे सांगितले. तर कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी, शेतकर्‍यांसोबत तिन्ही कायदे व आवश्यक त्या बाबींवर चर्चा झाली.शेतकर्‍यांचे शंका निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे सांगितले.