३ रोजी मोदी रेडिओवर

0
79

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. ऑल इंडिया रेडिओवर देशाला संबोधित करणार आहे. हे भाषण केवळ आकाशवाणीसाठी असून ते दूरदर्शन वृत्तवाहिन्याही प्रसारित करतील. भाषणाचा तत्क्षणी २४ भारतीय व १६ विदेशी भाषांमध्ये अनुवादही उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधानांनी सप्टेंबरमध्ये लोकांबरोबर रेडिओद्वारा संपर्कात राहणार असल्याचे म्हटले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी लोकांशी संपर्क साधण्याकरिता रेडिओचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असत.