३० जूनपूर्वी व्यवसाय नोंदणी, नूतनीकरण करा अन्यथा पर्यटन व्यावसायिकांना १ लाखाचा दंड

0
27

राज्य सरकारच्या पर्यटन खात्याने पर्यटन व्यावसायिकांना ३० जूनपूर्वी व्यवसायाची नोंदणी किंवा नूतनीकरण न केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा इशारा एका नोटिशीद्वारे दिला आहे.
गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायद्यातील तरतुदींनुसार, व्यवसाय करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला हॉटेल कीपर, इतर निवास, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, मोटरबोट, वॉटर स्पोर्टस् ऑपरेटर, हस्तकलेचे विक्रेते, पर्यटक मार्गदर्शक, छायाचित्रकार, सरकारी शॅक, खासगी शॅक आणि खासगी झोपड्या, डेक बेड आणि छत्र्या, साहसी खेळ, स्पाइस प्लांटेशन्स आणि ऑनलाइन सेवा देणार्‍या व्यावसायिकांना त्यांच्या उपक्रमांची पर्यटन विभागाकडे नोंदणी करावी लागेल.

आधीच नोंदणीकृत असल्यास, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांच्या आत नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल. नोंदणीचे नूतनीकरण आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून ३ महिन्यांच्या कालावधीत म्हणजे संबंधित वर्षांच्या ३० जूनच्या आत केले जावे, असे पर्यटन खात्याने काल जारी केलेल्या सार्वजनिक नोटिशीमध्ये नमूद केले आहे.
सर्व अर्जदार जे या कायद्याच्या वरील तरतुदींचे आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरतील, त्यांना विहित प्राधिकरणाकडून दंड ठोठावण्यात येणार आहे. दंडाची रक्कम १ लाखापर्यंतचा आकारली जाऊ शकते, असेही नोटिशीमध्ये म्हटले आहे.