मान्सूनचे आगम वेळेआधीच होणार

0
71

यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस २२ मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा पाऊस १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यानंतर २० ते २६ मेपर्यंत पाऊस केरळमध्ये, तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.