२५ कोटींची थकित घरपट्टी वसूल करणार : महापौर

0
17

पणजी महानगरपालिकेच्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या थकित घरपट्टीच्या वसुलीसाठी आवश्यक पावले उचलण्यात येणार आहेत. पणजी महानगरपालिका इमारत, मार्केट प्रश्‍न आणि नॅशनल थिएटरचा प्रश्‍न निकालात काढल्यास महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, असे मत महापौर रोहित मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या थकित घरपट्टीच्या वसुलीसाठी खास विभागाची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. घरपट्टीची वसुली झाल्यास आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

मार्केटमधील दुकाने वितरणाचा प्रश्‍न कित्येक वर्षे रेंगाळत पडला आहे. नॅशनल थिएटरचा विषय सुध्दा प्रलंबित आहे. नॅशनल थिएटरचा विषय निकालात काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सदर प्रस्तावाला नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो, उदय मडकईकर यांनी सुरुवातीला पाठिंबा होता; परंतु त्यांनी अचानक आपली भूमिका बदलली आहे. मनपाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सरकारकडे पाठविला जाणार आहे. मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.