१ ऑक्टोबरनंतर राज्यात ११.४७ इंच पावसाची नोंद

0
31

मान्सूनचा हंगाम यापूर्वीच संपलेला असला, तरी गोव्यात पावसाच्या सरी कोसळणे चालूच असून, मान्सून संपल्यानंतर १ ऑक्टोबर ते आतापर्यंत राज्यात तब्बल ११.४७ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण तब्बल ७५ टक्के एवढे जास्त आहे. २०१९ साली ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात राज्यात ५५५.६ मीमी. एवढ्या पावसाची नोंद झाली होती. हे प्रमाण सरासरी पावसापेक्षा १७४ टक्के एवढे जास्त होते.

या आकडेवारीवरून मान्सूननंतरच्या पावसात विक्रमी वाढ होऊ लागली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मत हवामान खात्यातील अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे. २०१८ साली मान्सून संपल्यानंतर ११८.६ मीमी. एवढ्या पावसाची नोंद झाली होती. हे प्रमाण सरासरीपेक्षा ४१ टक्के एवढे होते.