राणे यांनी मये येथील मालमत्तेच्या एक चौदाच्या उतार्यावर सरकार म्हणून मालकी नोंद झाली होती ती ‘म्युटेशन’ पद्धतीने काढून तेथे कस्टोडियन ऑफ दी एव्हेक्यू अशी नोंदणी करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.
या प्रश्नावर झालेल्या चर्चेत साखळीचे आमदार प्रमोद सावंत, मयेचे आमदार तथा उपसभापती अनंत शेट यांनी भाग घेतला. वरील तांत्रिक अडचणीमुळे मयेवासियांना त्रास होत असल्याचे राणे यांनी सांगितले. सरकारने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळेच आपण ठराव मागे घेत असल्याचे सांगितले.
म्युटेशनच्या माध्यमातून जर हा प्रश्न सोडविणे शक्य आहे तर गेल्या ५० वर्षांच्या काळात हा प्रश्न सोडविणे का शक्य झाले नाही, असा प्रश्न विष्णू वाघ यांनी केला.
नगर विकासमंत्र्यांनीही योग्य तो अभ्यास करून हा विषय कायम सोडविणार असल्याचे सांगितले. वरील प्रश्न सोडविताना कायदा आयोगाने सुचविलेल्या सूचनांचाही विचार व्हावा, असे आमदार अनंत शेट यांनी सांगितले.