१४४ कलम तात्काळ मागे घ्या : कामत

0
114

कोणतीही गरज नसताना गोवा सरकारने राज्यात १४४ कलम लागू केलेले आहे. आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी लागू केलेले हे कलम सरकारने तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली.
कोणतेही कारण नसताना अशा प्रकारे १४४ कलम लागू करून सरकार राज्यातील जनतेच्या मुक्तपणे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणू शकत नाही, असे कामत यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

म्हादईसंबंधी आलेले अपयश तसेच खाणी सुरू करण्यास, लोकांना रोजगार प्राप्त करून देण्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास, अर्थ व्यवस्थेस चालना देण्यास जे अपयश आलेले आहे त्यापासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच सरकारने अतिरेकी हल्ल्याचे नाटक करून राज्यात १४४ कलम लागू केल्याचा आरोपही कामत यांनी केला आहे.

राज्यात सध्या जत्रा व अन्य उत्सव चालू आहेत. तसेच लवकरच कार्निव्हल व शिगमोत्सव सुरू होणार आहे, असे सांगून १सरकार हे सण कसे साजरे करतील, असा सवालही कामत यानी केला आहे.