१२५ कोटींचे नवे उद्योग

0
91

सरकारची सहा कंपन्यांना मान्यता
राज्यातील बेरोजगाराचा प्रश्‍न सोडविण्याच्या बाबतीत सरकार गंभीर असून त्यासाठी सरकारने सहा कंपन्यांना त्यांचे वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. वरील कंपन्या १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. २०१७ पर्यंत ५० हजार नोकर्‍या निर्माण करणे कठीण आहे. परंतु नव्या गुंतवणूक धोरणाचा रोजगार निर्मितीसाठी बराच फायदा होईल, असे नाईक यांनी सांगितले. वेर्णे उद्योगिक वसाहतीतील ३२ भूखंड वेगवेगळ्या कंपन्यांना प्रकल्प उभारण्यासाठी मंजूर केल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. उभारण्यात येणार्‍या नव्या कंपन्यांमध्ये दोन औषध उत्पादन प्रकल्प, मरीन उत्पादन निर्यात प्रकल्प, इंजेक्शन मोल्डींग प्रकल्प, गार्मेन्टस आणि बिवरेज आदी उद्योग प्रकल्पांचा समावेश आहे. नवी डेअरी उभारण्याच्या बाबतीत सरकारकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे नाईक यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुसरी डेअरी उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. सध्या राज्यात प्रतिदिनी ७० हजार लिटर दुधाचे उत्पादन होत असल्याचे नाईक यांनी सांगितले. संजीवनी सहकारी साखर कारखान्यात सीसीटीव्ही बसविल्याचे त्यांनी सांगितले.