Home Featured १० वी परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

१० वी परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

0

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वर्ष २०२०-२०२१ चा दहावीचा निकाल १२ जुलै २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केला जाणार आहे.

या परीक्षेसाठी २३ हजार ९६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तसेच ५१७ नापास विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. राज्यातील कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. मंडळाने अंतर्गत पद्धतीने दहावीचा निकाल तयार केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नसेल त्यांना परीक्षेला बसण्यास मान्यता दिली जाणार आहे.