बेकायदा बांधकामांवरील कारवाई संथगतीने; हायकोर्टाने फटकारले

0
6

हणजूण येथील विकास प्रतिबंधित क्षेत्रातील 175 बेकायदा बांधकामांना टाळे ठोकण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल पुन्हा एकदा हणजूण पंचायतीला फटकारले. तसेच पंचायत सचिवांना न्यायालयाच्या आदेशाच्या कार्यवाहीबाबत प्रतिज्ञापत्र बुधवारी सादर करण्याचा निर्देश दिला.

गोवा खंडपीठाने विकास प्रतिबंधित क्षेत्रातील 175 बेकायदा बांधकामांना टाळे ठोकण्याचा आदेश दिलेला आहे; मात्र हणजूण पंचायतीकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. आत्तापर्यंत 144 बांधकामांना टाळे ठोकण्यात आले आहे, अशी तोंडी माहिती काल न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे आदेशाच्या कार्यवाहीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्देश पंचायत सचिवांना न्यायालयाने दिला.