Home बातम्या होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर अमेरिकेकडून नाकेबंदी सुरू

होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर अमेरिकेकडून नाकेबंदी सुरू

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लादलेली सागरी नाकेबंदी सुरू झाली आहे. हा निर्णय काल संध्याकाळी 7.30 वाजता (अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता) अंमलात आला. या निर्णयानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवून त्याची तपासणी केली जाईल. इराणला टोल भरलेल्या जहाजांवर विशेष लक्ष दिले जाईल. पश्चिम आशियातील या संघर्षाचे फटके भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. एका दिवसापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेकायदेशीर टोल देणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही. त्यामुळे इराणच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का बसेल, असे म्हटले होते.