होंड्यात बिवट्याचा मोटरसायकल चालकावर हल्ला : दोघे जखमी

0
87

होंडा-साखळी मार्गावर काल एका बिबट्याने मोटरसायकल चालकावर हल्ला केल्याने दोघेजण जखमी झाले. काल सायंकाळी ७.१५ वा. ही घटना घडली.प्रकाश भैरू शिंदे (वय ३२) राहणारा साळ, कोळगीरे व दर्शन बाबाजी देसाई राहणारा नूतनवाडी कळणे, दोडामार्ग अशी जखमींची नावे आहेत.

वरील दोघेही वाळपईहून साखळी येथे मोटरसायकलने जात होते. होंडापासून एक किलोमीटर अंतरावर वाळपई-साखळी मार्गावर एका बिबट्याने त्यांच्या मोटरसायकलवर उडी घेतली आणि त्याठिकाणाहून पळ काढला. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. त्यांना साखळी सरकारी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे त्या दोघांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आलेे. वाळपई-साखळी या मार्गावर सतत वाहतूक सुरू असते. पणजीला जाण्यासाठी तोच मुख्य रस्ता आहे.
काल झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण आहे. सत्तरीत बिबट्याचा वावर लोक वस्तीत वाढला असून त्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.