Home बातम्या हॉर्नच्या आवाजात बदल होणार; गडकरींचा प्रस्ताव

हॉर्नच्या आवाजात बदल होणार; गडकरींचा प्रस्ताव

0

शहरांमधील वाहतुकीत गाड्यांचा गोंगाट आणि कानाला त्रास देणारा हॉर्नचा आवाज नेहमीच असतो. यामुळे गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण होत असते. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला असून प्रस्तावानुसार गाड्यांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाऐवजी भारतीय संगीत वाद्यांचे आवाज ऐकायला मिळतील. मंत्री श्री. गडकरी यांनी एका कार्यक्रमात हॉर्नचा आवाज ऐकायला गोड आणि आनंददायक असावा. त्यानुसार, बासरी, तबला, व्हायोलिन, आणि हार्मोनियम यांसारख्या भारतीय वाद्यांचे आवाज वाहने वापरू शकतील असे म्हटले आहे.