Home बातम्या हेदोडे येथे विद्यार्थिनीची आत्महत्या

हेदोडे येथे विद्यार्थिनीची आत्महत्या

0

वाळवंटी नदीत दोघे बुडाले

सत्तरीत दोन दिवसांत दोघे बुडण्याची तर हेदोडे सत्तरी येथे विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. हेदोडे सत्तरी येथे १७ वर्षीय युवतीने मागील बाजूस वाळवंटी नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ती महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी होती. पंचनामा उपनिरीक्षक तुळशीदास नाईक यांनी केला.

दरम्यान, केरी-सत्तरी येथे वाळवंटी नदीत सतीश बाळा धरणे (४०) मूळ साटेली-भेडशी महाराष्ट्र यांचा बुडून मृत्यू झाला. सतीश केरी सत्तरी येथे आपल्या कुटुंबासमवेत सासरवाडीला आला होता. वाळवंटी नदीत आंघोळ करण्यासाठी गेला असता ते पाण्यात बुडाले. कुडशे सत्तरी येथे धोंड व्रत घेतलेला चंद्रकांत गोविंद आरोसकर (३५) यांचाही परवा रात्री बुडून मृत्यू झाला. ते रात्री ७ ते ८ च्या दरम्यान आंघोळ करण्यासाठी गेला असता पाण्यात बुडाले. त्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह बाहेर काढला. दोन्ही घटनेचे पंचनामे पोलीस निरीक्षक रमेश गावकर यांनी केले.

दरम्यान, सोनाळ मोवाचो गुणो या पर्यटन स्थली परवा एक पर्यटक बुडता बुडता वाचला. परवा सायंकाळी ६ वाजता एक पर्यटक पाण्यात पोहताना त्याचा तोल गेला आणि पाण्यात बुडाला. पण त्याच ठिकाणी असलेल्या धोंड भक्तांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचविला. तो इस्पितळात उपचार घेत आहे.