हेडगेवार शाळेत वेशभूषा, कथाकथन स्पर्धा

0
353
वेशभूषा स्पर्धेत गांधीजींच्या भूमिकेत सहभागी विद्यार्थी.

पणजी (प्र. प.)
कुजिरा, बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार प्राथमिक शाळेत गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त इयत्ता पहिली व दुसरी आणि तिसरी व चौथीसाठी दोन गटांत वेशभूषा व कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. इ. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी ‘मी गांधी बोलतोय…’ या विषयावर वेशभूषा तर विद्यार्थिनींसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. वेशभूषा स्पर्धा : प्रथम गट – मल्हार ढोरे (प्रथम), जितेश पै वेर्णेकर (द्वितीय), मिहीर खांडेपारकर (तृतीय). दुसरा गट – तेजस सावईकर (प्रथम), ध्रुव महाजन (द्वितीय), कपिल नेरुळकर (तृतीय).
कथाकथन स्पर्धा : प्रथम गट – श्रीष्टी गावस (प्रथम), अर्णवी प्रभू पर्रीकर (द्वितीय), मृगना सरदेसाई (तृतीय). द्वितीय गट : इशानी देसाई (प्रथम), तृषा सावंत (द्वितीय), सुमेधा काणकोणकर (तृतीय).
सौ. हर्षा वळवईकर आणि सौ. स्मिता म्हामल यांनी परीक्षण केले. व्यासपीठावर पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ. दीक्षा वायंगणकर, प्राथमिक विभाग प्रमुख भानुदास म्हाकले उपस्थित होते. परीक्षक सौ. वळवईकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका सपना कुडव यांनी विद्यार्थ्यांना ‘वैष्णव जन तो…’ हे भजन शिकविले. त्यानंतर स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन प्रणाली देविदास यांनी तर भानुदास म्हाकले यांनी आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.