व्हाळशीत आयुर्वेदिक इस्पितळाचे भूमिपूजन

0
118
व्हाळशी-डिचोली येथे दीनदयाळच्या नियोजित आयुर्वेदिक इस्पितळ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी उपस्थित असलेले आमदार राजेश पाटणेकर, अध्यक्ष वल्लभ साळकर, उपाध्यक्ष कांता पाटणकर, नगराध्यक्ष सतीश गावकर, संचालक अरुण नाईक, श्याम मातोंडकर, डॉ. राजेश केणी व इतर.

डिचोली (न. प्र.)
दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था संचालित दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे सुमारे १० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या आयुर्वेदिक व ऍलोपॅथी इस्पितळाचे भूमिपूजन विजयादशमीच्या मुहूर्तावर व्हाळशी येथे नियोजित जागेत करण्यात आले.
यावेळी डिचोलीचे आमदार – राजेश पाटणेकर, दीनदयाळ नागरी सहकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष – वल्लभ साळकर, उपाध्यक्ष – कांता – अरुण नाईक, श्याम मातोंडकर, अर्जुन मळगावकर, डॉ. राजेश केणी, सदानंद नाटेकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, सरगम चणेकर, श्रुती घाटवळ, सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष – विजयकुमार नाटेकर, संदेश प्रभू चोडणकर व संस्थेचे इतर संचालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्याम मातोंडकर व सौ. मातोंडकर यांनी नियोजित इस्पितळ प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी वल्लभ साळकर यांनी या नियोजित इस्पितळाची पायाभरणी डिसेंबरमध्ये करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे सहा कोटी तर दुसर्‍या टप्प्यात उर्वरित ४ कोटी खर्च करून काम पूर्ण करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये सर्व अत्याधुनिक आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
तसेच या इस्पितळात लोकांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर इस्पितळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे साळकर यांनी सांगितले. दरम्यान, या इस्पितळाचे भूमिपूजन काल दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. व्हाळशी येथे अत्याधुनिक आयुर्वेदिक इस्पितळ होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.