दरम्यान, हॅली सेवा सुरू करण्यासाठी साधनसुविधांची गरज असून ती सुरू करता यावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली असून ती पूर्ण झाल्यानंतरच ही हॅली सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हॅली सेवेखाली राज्यात येणार्या गर्भश्रीमंत पर्यटकांना हॅलिकॉप्टर व ‘सी प्लेन’ (समुद्रातून उड्डाण करणारे विमान) सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने गंभीरपणे विचार चालवलेला असून त्यासाठी कोटिंग प्लॅटफॉर्म व हॅलिपॅड्सची सोय करावी लागणार आहे. त्यासाठी केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यात येणार्या श्रीमंत पर्यटकांना काही तासांत गोव्यातील जास्तीत जास्त पर्यटन स्थळे पाहता यावीत यासाठीच हॅली पर्यटनाची व्यवस्था करण्याचा निर्णय खात्याने घेतला असल्याचे सांगण्यात आले.
गोवा म्हणजे केवळ समुद्र किनारे नसून समुद्र किनार्यांपलिकडेही सुंदर अशी पर्यटन स्थळे गोव्यात आहेत हे पर्यटकांना दाखवून देण्याच्या प्रयत्नांचा हा एक मोठा भाग असल्याचे खात्यातील त्यांनी सांगितले. येणार्या काळात ग्रामीण पर्यटनाला चालना देऊन ग्रामीण भागातील लोकांचेही जीवनमान आर्थिकदृष्ट्या उंचावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
हॅलिकॉप्टरद्वारे पर्यटकांना काब–द–राम, बोंडला, साळावली, दोनापावला आदी सुंदर पर्यटन स्थळांचे अवघ्या तासांतच दर्शन घडवणे हा हॅलीसेवा सुरू करण्यामागील उद्देश आहे. मात्र, या सेवेसाठी पर्यटकांना २० ते ३० हजार रु. मोजावे लागतील व केवळ श्रीमंत पर्यटकांनाच ते परवडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.