हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एस. पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन

0
3

चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ असलेले आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एस. पी. हिंदुजा यांचे बुधवारी लंडनमध्ये निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हिंदुजा यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. श्रीचंद पी. हिंदुजा किंवा एस. पी. म्हणून ते ओळखले जात. 50 च्या दशकाच्या सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले होते. त्यांच्या पश्चात गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा हे त्यांचे तीन भाऊ आहेत. यासोबतच दोन मुली शानू आणि विनू असा त्यांचा परिवार आहे.