कुर्टी-फोंडा येथील गोवा दूध उत्पादक संघाने आजपासून हाय फॅट दूधाचा दर लिटरमागे तीन रुपयांची वाढवला आहे. ४२ रुपये दरावरून आता लिटरमागे ४५ रुपये मोजावे लागतील.
महाराष्ट्रात म्हशीच्या दूधाचे दर चार रुपयाने वाढल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगण्यात आले. म्हशीचे दूध महाराष्ट्रातून आयात करावे लागते. बाकी दूधाचे दर आहेत तसेच राहतील.