हळदोण्यात खुनी हल्ला, पाच संशयितांना अटक

0
27

किटला हळदोणा येथील एका बाररध्ये दारू पित असताना दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. यात एका गटाकडून अश्विन आलेमाव याच्यावर वैयक्तिक वैमनस्यातून पाच संशयितांनी खुनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

अश्‍विन याला सध्या उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली. याप्रकरणी सालिक (हळदोणा), हँलेस, जोवितो (दोघे किटला), व्हॅलॅन्सिओमिस्टर अँडरसन, (पोंबुर्फा) या पाच संशयितांना म्हापसा पोलीस पथकाने रात्री उशिरा अटक केली.