हरियाणामध्ये आजपासून सात दिवस लॉकडाऊन

0
125

कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर हरियाणा सरकारने आज सोमवार दि. ३ मेपासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. गृहमंत्री अनिल विज यांनी याबाबत घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यात सात दिवस कडक लॉकडाऊन असेल. हरियाणात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढला आहे. दरम्यान, देशात ३ ते ५ मे दरम्यान करोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येईल, असे केंद्र सरकारला करोनाबाबत सल्ला देणार्‍या पथकाच्या प्रमुखांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाऊन लावण्याचे आवाहन केले आहे.