कोरोनाची औषधे एमआरपीनेच विकण्याचा न्यायालयाचा आदेश

0
140

राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मोठ्या प्रमाणावर प्राणवायूचा तुटवडा तसेच औषधांची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार प्राणवायू सिलेंडर्स, फ्लो मीटर्स आणि कोरोनाच्या उपचारांसाठी आवश्यक औषधे आता एमआरपीपेक्षा जास्त किमतीला विकली जाणार नाहीत यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले आहेत. दरम्यान, दिल्लीत शनिवारी एका रुग्णालयातील डॉक्टरसह १२ कोरोना रुग्णांचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला, तर गुजरातमध्ये एका रुग्णालयात लागलेल्या आगीत १८ जणांचा बळी गेला. त्यापैकी १६ कोरोना रुग्ण होते. दिल्लीस्थित बत्रा रुग्णालयात प्राणवायूचा साठा शनिवारी संपल्यामुळे आठ रुग्णांचा मृत्यू झाला.