स्मशानभूमीचे छत कोसळून २१ ठार

0
212

उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे स्मशानभूमीचे छत कोसळल्याने त्या खाली दबून २१ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. याबाबत शासनाने बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारसाठी आलेले लोक पाऊस आल्याने एका छताखाली उभा राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या अंगावर छत कोसळून ते सर्वजण त्याखाली दबले गेले. पोलीस व एनडीआरएफ टीम घटनास्थळी आल्यावर बचावकार्य सुरू झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे जाहीर केले.