स्थलांतरीत कामगारांसाठी रोज धावणार १०० श्रमिक रेलगाड्या

0
216

>> रेल मंत्रालयाने अधिकार्‍यांबरोबर घेतला आढावा

लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत अडकून पडलेल्या व विनाविलंब आपल्या घरी जाण्यास इच्छुक असलेल्या स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावी नेऊन सोडण्यासाठी देशभरात रोज १०० विशेष श्रमिक रेल्वेगाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वेमधील सूत्रांनी काल दिली.

केंद्रीय गृह व्यवहार मंत्री व रेल्वे मंत्रालयाने काल गोव्यातील नोडल अधिकार्‍यांसह विविध राज्यांतील नोडल अधिकार्‍यांबरोबर या प्रश्‍नी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांचा फेरआढावा घेण्यात आला. देशभरात यापूर्वीच स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ४५० श्रमिक रेल्वेगाड्या धावल्याची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देण्यात आली.

आता यापुढे देशभरातून रोज १०० विशेष श्रमिक रेल्वेगाड्या स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या गावी नेऊन सोडण्यासाठी धावणार असल्याची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देण्यात आली.
या विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांसंबंधीची मार्गदर्शक तत्वे रेल्वे मंत्रालयाने यापूर्वीच तयार केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या मार्गदर्शक तत्त्वांची यावेळी माहिती देण्यात आली.

गोव्यातून आतापर्यंत दोन
विशेष श्रमिक रेल्वेगाड्या
गोव्यात अडकून पडलेल्या स्थलांतरीत कामगारांना घेऊन यापूर्वीच दोन विशेष श्रमिक रेल्वेगाड्या गेलेल्या असून त्यापैकी पहिली रेल्वेगाडी मध्यप्रदेशात तर दुसरी जम्मू काश्मीरला रवाना झाली होती. जम्मू काश्मीरमधील रेल्वेगाडीतून १०५५ तर मध्यप्रदेशात गेलेल्या रेल्वेगाडीतून १११९ स्थलांत्तरीत कामगार आपल्या गावी गेले आहेत.