स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ यू-ट्यूबवरून हटवला

0
20

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर तो स्टिंग ऑपरेशनचा वादग्रस्त व्हिडिओ यू-ट्यूबवरून हटविण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका हिंदी चॅनेलने कथित स्टिंग ऑपरेशनचे वृत्त पसारित केल्याने खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आणि तृणमूल कॉंग्रेसचा एक उमेदवार पक्षांतर करण्यासाठी तयार असल्याचे वृत्तात म्हटले आहे. या प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ यू-ट्यूबवरून हटविण्याचा आदेश दिला. सदर प्रकरणी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना कारवाईची सूचना देण्यात आली आहे.

तृणमूलचे उमेदवार चर्चिल आलेमाव, कॉंग्रेसचे संकल्प आमोणकर, आवेर्तान फुर्तादो आणि सावियो डिसिल्वा यांनी पैसे घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ मोडतोड करून बनविल्याचा आरोप कॉंग्रेस आणि तृणमूलने केला असून चारही उमेदवारांनी तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.