सैन्याचे अभिनंदन करणे हे कर्तव्य : संरक्षणमंत्री

0
64

भारतीय सेनेने चांगले धाडस दाखवून ज्या आंतकवाद्यांनी भ्याडपणे हल्ला केला त्याला चोख उत्तर दिले त्यांचे अभिनंदन करणे हे संरक्षणमंत्री या नात्याने आपले कर्तव्य आहे.

आपण देशाचा संरक्षणमंत्री असल्याने आपण भारताच्या सीमा रेषा सुरक्षित ठेवण्याचे काम केलेले आहे आणि यापुढेही करणार असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या अभिनंदनपर जाहीर सभेत बोलताना सांगितले.
पर्रीकर म्हणाले की, विरोधक ओरडतात, टिका करतात की भाजपाने विमाने, हेलीकॉप्टर घेते वेळी बराच भ्रष्टाचार केला ते दलाली करतात असा आरोप आपल्या भाषणातून करीत आहेत. आम्ही कोणतीही दलाली केलेली
नाही.
पक्षाला लोकांचे हित लक्षात घेऊन त्याच्या समस्या सोडवण्याच्या आहेत. पण विरोधकांनी आजपर्यंत दलालीच केली. त्यांनाच दलाली म्हणजे काय असते ते माहिती आहे आणि तेच दलाली करू शकतात असेही ते म्हणाले.
आपण गोव्यात आल्यावर कॉंग्रेसवाल्यांना भीती वाटते, त्याचे कारण आपल्याला कळत नाही. आपण सैन्याला सशक्त करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. भारतीय सैन्याकडे कुणाशीही झगडण्याची ताकद आहे असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, आजपर्यंत गोव्याला केंद्रात कॅबिनेटमंत्रीपद मिळाले नव्हते. ते मंत्रीपद संरक्षणमंत्री या रूपाने पर्रीकर यांना मिळाले. विरोधक म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरेच करतात. त्यांच्याकडे आणखी काहीही होत नाही. पण ते त्या देशांमध्ये पाठिंब्यासाठी जातात. मैत्री करण्यासाठी जातात आणि त्यामुळे भारतावर हल्ला झाला त्यावेळी अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला हे यावरून दिसून येते, असे ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री डिसोझा, आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक, कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, आमदार ग्लेन टिकलो, किरण कांदोळकर यांनीही भारतीय सैनिक, पंतप्रधान व संरक्षणमंत्री यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.