सुवर्णक्षण ः कोव्हॅक्सिन … कोविशिल्ड

0
250
  • मंजुषा पराग केळकर

होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी उतरत आपल्यापर्यंत पोहोचते आहे. तेंव्हा कोणताही किंतु/परंतु न ठेवता कोरोना लसीकरणाची ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी पुढे येऊ या व आपल्या परीने ह्यात आपले योगदान देऊयात.

समस्त भारतीयांसाठी आजच्या खास गौरव दिनाच्या शुभेच्छा. आज समस्त भारतीयांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवल्या गेलाय आणि विश्वगुरु होण्याच्या दिशेने एक दमदार पाऊल आज आपण ठामपणे रोवलेय.
आसुरी ताकदीचा प्रयोग करून संपूर्ण जगावर राज्य करण्याच्या असुयेपोटी काही विदेशी शक्तींनी, जगाला हादरा देणारा एक कोरोना नामक असुर तयार करून जगभर त्याला थयथयाट करायला सोडले आणि खरंच, सारे जग हादरून गेले, भांबावून गेले.

  आचार-विचार आणि अनाचार ह्यात द्वंद्व सुरू झाले आणि अनाचाराने परिसीमा गाठली. पण नेहमीच सत्य हे शाश्वत असते. असत्य हे क्षणभंगुर असते.. ह्या उक्तीप्रमाणे सगळे होतेय. माणूस माणसाला ओळखायला लागला, संवेदना जागृत व्हायला लागली, आपल्या अमर्याद गरजांची मर्यादा आपण ओळखायला शिकलो. देवावरचा विश्वास वाढीस लागला. विज्ञानाची कास धरत प्रगत गोष्टी करावयास आपण शिकलो. आपली पुरातन चिकित्सापद्धती परत अंगीकारावयास लागलो. धर्मग्रंथ अभ्यासून आपले शास्त्र किती सखोल आणि नेमके आहे ह्याचा अभ्यास पुढे येऊ लागला. आपले भारतीय पूर्वापार चालत आलेले राहणीमान किती खरे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले नव्हे त्याला जगन्‌मान्यता मिळाली.

ह्या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करता भारत हा विश्वगुरु होता, आहे आणि असणारच हे परत एकदा सिद्ध होऊ पाहतेय.

जागतिक दर्जावर उच्च स्थान ग्रहण करण्यासाठी देशातील लोकांवर विश्वास ठेवून, त्यांना संपूर्ण राजकीय पाठिंबा, आर्थिक आधार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण विश्वात प्रस्थापित करणारे आपले आदरणीय प्रधानमंत्री, अथक प्रयत्न करून स्वदेशी लस लवकरात लवकर शोधणारे आपले शास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्र आणि संपूर्ण समाज ह्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आज यश आले आहे.
होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी उतरत आपल्यापर्यंत पोहोचते आहे.
ह्या लसीबद्दल खूप समज-गैरसमज आहेत. पण मला असे वाटते की आपण आपले शास्त्रज्ञ, पंतप्रधान ह्यांवर संपूर्ण विश्वास ठेवावयास हवा. कितीतरी चाचण्या पूर्ण होऊन अंततः मानवीय चाचण्यासुद्धा पूर्ण होऊन ही लस सिद्ध झाली आहे.
मी स्वतः ह्या मानवीय चाचणीचा एक भाग आहे.(भारत बायोटेकच्या मानवीय चाचणीत मी सहभागी आहे) मी पूर्णतः ठणठणीत आहे. मला कोणताही त्रास झाला नाहीय/होत नाहीय. त्यामुळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकते. तेंव्हा कोणताही किंतु/परंतु न ठेवता कोरोना लसीकरणाची ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी पुढे येऊ या व आपल्या परीने ह्यात आपले योगदान देऊयात. अंततः सगळे छानच होणार आहे ह्यावर विश्वास ठेवा.