सुकूरमध्ये पीकअपच्या धडकेने युवक ठार

0
13

पर्वरी येथील कदंब मार्गावरील कदंब डेपोसमोरील राष्ट्रोळी महारुद्र मंदिराच्या बाहेरील बाकड्यावर बसलेल्या उमेश मुट्टगी (35, सुकूर) या युवकाला मालवाहू पीकअपने धडक दिल्याने उमेश याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल रविवारी सकाळी 11 वाजता येथील कदंब मार्गावरील राष्ट्रोळी महारुद्र मंदिराबाहेरील बाकड्यावर विश्रांतीसाठी उमेश मुट्टगी हा युवक बसला होता. त्याचवेळी कदंब मार्गावरून येणाऱ्या टाटा मालवाहू पीकअपने (जीए व्ही 8968) बसलेल्या उमेश याला धडक दिली असता त्याचा जागीच मृत्यू झाला. पीकअपचालक रियान शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हवालदार श्रीपाद तेली यांनी अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला आहे.